Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीविशाळगड मुक्तीसाठी संघर्ष हे ऐतिहासिक कार्य : आमदार नितेश राणे

विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष हे ऐतिहासिक कार्य : आमदार नितेश राणे

विशाळगड पायथ्याशी झालेल्या तोडफोडीमुळे निर्माण परिस्थिती नियत्रंणात

कोल्हापूर : विशागडावरील अतिक्रमणावरुन झालेल्या दगडफेकीचे पुणे, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात प्रतिसाद उमटले असून पोलिसांनी परिस्थिती नियत्रंणात आली आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संभाजीराजे छत्रपती यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत, मला अटक करा, पण शिवप्रेमींना त्रास देवू नका, असे सांगितले. त्यातच मुस्लिम संघटनांनी याप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींना अटक करण्याची मागणी केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

मी आक्रमक होतो. पण मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे आक्रमक झालो, या सगळ्यासाठी मी आक्रमक झालो असेल तर मला गर्व असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. खासदार शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर तीव्र शब्दात निषेध केला आहे. यानंतर आता संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली.

शिवभक्तांबरोबर मी उभा

विशाळगड मुक्ती साठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे, एक ऐतिहासिक कार्य तुम्ही करत आहात. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ही काळजी आम्ही घेऊ, असे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट केले आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करायचा आहे का?

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजताच संभाजीराजे शाहूवाडी पोलिस स्टेशनला हजर झाले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करायचा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल केला असे समजले म्हणून मी स्वतः पोलीस ठाण्यात आलो. शाहूवाडी पोलिस ठाण्यात दीड तासापासून चर्चा झाली. सगळ्या घटनेला मला जबाबदार धरून मला अटक करा, शिवभक्तांना त्रास देऊ नका. गुन्हा दाखल केला असाल तर मी इथेच थांबतो, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजेंना अटक करण्याची मागणी

संभाजी राजेंना अटक करा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडी बद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांना अटक करा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. यासंबंधीचे निवेदन देखील मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

हुल्लडबाजांच्या उतावळेपणामुळे गावांमध्ये प्रचंड दहशत

पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील गडप्रेमींनी सकाळीच गडाच्या पायथ्याला गर्दी केली. त्यांच्या संख्येचे अंदाज न आल्याने पोलिस बळ अपुरे पडले. गडावर जाणारे सर्व मार्ग रोखून धरण्यात पोलिसांना अपयश आले. भर पावसात सुमारे सात ते आठ हजार गडप्रेमींची ये-जा सुरू राहिल्याने पोलिसांचे गर्दीवर नियंत्रण राहिले नाही. परिणामी, बेफान झालेल्या तरुणांनी घरांची आणि वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली. गडाकडे जाणाऱ्या अनेक तरुणांच्या हातात हातोडे होते. त्यांनी हातोड्यांनी घरे, दुकानांची तोडफोड केली.

तोडफोडीनंतर शिवभक्तांवर गुन्हे दाखल

स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांपासून धुमसत आहे. त्यांनी विशाळगडाच्या दिशेने कूच करण्याचा इशाराही दिला होता. यादरम्यान, रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ५०० हून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. विशाळगड हा जिहादी अतिक्रमणांपासून मुक्त झालाच पाहिजे. आणि तो देखील ह्या वर्षात.
    कोकण जिहाद्यांच्या घशात घालायच्या आधी हा अतिरेक, शिवप्रेमींनी आणि संभाजी महाराजांनी संपवायलाच हवा.

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -