Saturday, October 18, 2025
Happy Diwali

जर काही चूक-भूल झाल्यास माफ करा, अनंत-राधिकाच्या लग्नानंतर कोणाल्या म्हणाल्या नीता अंबानी?

जर काही चूक-भूल झाल्यास माफ करा, अनंत-राधिकाच्या लग्नानंतर कोणाल्या म्हणाल्या नीता अंबानी?

मुंबई: भारताचे प्रसिद्ध बिझनेसमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या छोट्या मुलाचे अनंत अंबानीचे लग्न राधिका मर्चंट हिच्याशी १२ जुलैला संपन्न झाले. आता अंबानी कुटुंबात लग्नानंतरचे कार्यक्रम सुरू आहेत. या दरम्यान, देश-परदेशातून प्रसिद्ध लोक या लग्नात उपस्थित होते.

या दरम्यान भारतासह संपूर्ण जगातील मीडियाची नजर या शाही कार्यक्रमावर होती. मीडियाने दिवसरात्र येथील लग्नाचे कार्यक्रम आणि तेथे येणाऱ्या पाहुण्यांना कव्हर केले. नीता अंबानी यांनी यासाठी मीडियाचे आभारही मानले. सोबतच सोमवारी होणाऱ्या रिसेप्शनसाठी आमंत्रितही केले.

रिसेप्शनमध्ये येण्याचे निमंत्रण

नीता अंबानी यांनी रविवारी रेड कार्पेटवर येत अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे कव्हरेज करण्यासाठी मीडियाचे आभार मानले. ते म्हणाले लग्नादरम्यान आमच्याकडून काही चूक-भूल झाल्यास माफ करा.तसेच नीता अंबानी यांनी मीडियाला हे ही सांगितले की तुम्ही सगळे सोमवारी होणाऱ्या रिसेप्शनसाठी निमंत्रित आहात.

मुकेश अंबानी झाले भावूक

दुसरीकडे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लग्नानंतर राधिका मर्चंट यांच्या विदाईचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यात अनंत अंबानीचे वडील मुकेश अंबानी खूप भावूक दिसत आहेत. सोबतच त्यांच्या डोळ्यातही अश्रू दिसत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >