Wednesday, March 19, 2025
Homeक्रीडाEuro Cup 2024: स्पेनने रचला इतिहास, इंग्लंडला हरवत जिंकला युरो कप

Euro Cup 2024: स्पेनने रचला इतिहास, इंग्लंडला हरवत जिंकला युरो कप

मुंबई: युरो कप २०२४चा फायनल सामना भारतीय वेळेनुसार १५ जुलै सोमवारी खेळवण्यात आला. जर्मनीच्या बर्लिनमध्ये झालेल्या सामन्यात स्पेनने इंग्लंडला हरवत खिताब आपल्या नावे केला. या विजयासह स्पेन युरो कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.

२०२४च्या फायनलमध्ये स्पेनने इंग्लंडला २-१ असे हरवत ट्रॉफी आपल्या नावे केली. फायनल सामना रोमहर्षक ठरला. सामन्यात शेवटी विनिंग गोल झाला नाहीतर सामना पेनल्टी शूटआऊटला पोहोचला होता.

याविजयासह स्पेनने चौथ्यांदा युरो कपचा खिताब जिंकला. एखाद्या स्पर्धेत एका संघाने सर्वाधिक वेळा जिंकलेला खिताब आहे. दरम्यान, स्पेनने बारा वर्षानंतर युरो कप जिंकला आहे. तर दुसरीकडे इंग्लंड पुन्हा एकदा युरो कपचा खिताब जिंकण्यात अयशस्वी ठरले. याआधी २०२०मध्ये खेळवण्यात आलेल्या युरो कपच्या फायनलमध्ये इंग्लंडला पराभव सहन करावा लागला होता. २०२०च्या स्पर्धेत इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवले होते.

यामुळे सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचूनही इंग्लंडला हा खिताब पटकावता आला नाही. स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील फायनल सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. मात्र दुसऱ्या हाफची सुरूवात रोमहर्षक झाली. सामन्याच्या ४७व्या मिनिटालाच स्पेनने पहिला गोल करत १-० अशी आघाडी घेतली.

त्यानंतर बराच वेळ इंग्लंड गोलसाठी संघर्ष करत होता. अखेर ७३व्या मिनिटाला इंग्लंडकडून गोल करण्यात आला आहे. इंग्लंडच्या पाल्मरने हा गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. यावेळेसही वाटत होते की २०२० प्रमाणे पेनल्टी शूटआऊट रंगणार आहे. मात्र असे झाले झाली सामन्याच्या ८६व्या मिनिटाला स्पेनने दुसरा गोल करत ही आघाडी वाढवली. दरम्यान ९० मिनिटानंतर आणखी ४ मिनिटांचाही अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. मात्र इंग्लंडला तेव्हाही गोल करता आला नाही आणि त्यांचा पराभव झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -