
मुंबई: सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध प्रयत्न करत असतात. नव-नव्या उत्पादनांचा वापर करतात मात्र त्यानंतरही चेहऱ्यावरून डाग,पुटकुळ्या कमी होत नाहीत. याच कारणामुळे अधिकतर लोक त्रस्त असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की डिहायड्रेन त्वचेशी संबंधित समस्या निर्माण करू शकते.
डिहायड्रेशन पुरेसे पाणी न प्यायल्याने होते. यामुळे नकारात्मक परिणाम चेहऱ्यावर होतो. जर तुम्ही नियमितपणे ७ ते ८ ग्लास दररोज पाणी पित नसाल तर यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.
पिंपल्स आणि काळवंडलेली त्वचा
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तेलाचे प्रमाण वाढते यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळवंडल्यासारखी होते. डार्क सर्कल्स होण्याचे एक कारण डिहायड्रेशनही असू शकते.
डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी करा ही कामे
डिहायड्रेशनपासून बचावासाठी तुम्ही दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे. याशिवाय फळांचे सेवन केले पाहिजे. ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते.