Wednesday, May 7, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीरायगड

Alibaug accident : कार्लेखिंडीच्या वळणावर अलिबाग-पनवेल एसटी बसला अपघात

Alibaug accident : कार्लेखिंडीच्या वळणावर अलिबाग-पनवेल एसटी बसला अपघात

दोन किरकोळ जखमी, झाडामुळे मिळाला बसला आधार


अलिबाग : वडखळ-अलिबाग या राष्ट्रीय महामार्गावरील अलिबाग शहर पोलिस ठाणे हद्दीतील कार्लेखिंडीच्या वळणावर आज सकाळी आठच्या सुमारास राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या अलिबाग-पनेवल या एसटी बसला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोघेजण किरकोळ जखमी झाले.


अलिबाग आगाराची एम.एच.०७-७३९८ या क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे अलिबागहून पनवेलकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. कार्लेखिंडमधील मोठ्या वळणावरच्या उतारावर बस येताच बसचा एक्सल तुटल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसला अपघात झाला. त्यानंतर ही बस तेथील झाडाला अडकल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींवर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. याबाबत अलिबाग शहर पोलिसात नोंद झाली आहे.

Comments
Add Comment