मुंबई: जर तुम्ही OnePlus १२ खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही तुमच्यासाठी चांगली वेळ आहे. कारण अॅमेझॉनवर या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. हा फोन OLED डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसहित आहे .
OnePlus 12वर अॅमेझॉनवर मोठी सूट मिळत आहे. या फ्लॅगशिप डिव्हाईसवर अॅमेझॉनवर ७ हजार रूपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. दरम्यान ही ऑफर ग्राहकांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डसोबत मिळेल. अॅमेझॉनवर OnePlus 12 हा 2GB + 256GB व्हेरिएंट आपल्या ओरिजिनल किंमतीत ६४,९९९ रूपयांना लिस्टेड आहे. मात्र बँक ऑफरसोबत या फोनची किंमत कमी होऊन ५७,९९९ रूपये होईल.
ग्राहकांना एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. अशातच ग्राहक ६१,४७९ रूपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. दरम्यान, एक्सचेंज ऑफरमध्ये सर्वाधिक सूट मिळवण्यासाठी जुना फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय पर्यायही दिला जात आहे. हा फोन ग्राहकांना 16GB + 512GB व्हेरिएंटमध्येही खरेदी करता येणार आहे