मुंबई: स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन २०२४च्या फायनलमध्ये नोवाक जोकोविचने हरवत दुसऱ्यांदा विम्बल्डनचा खिताब जिंकला आहे. अल्काराजने जोकोविचला सरळ सेटमध्ये ६-२, ६-२, ७-६ असे हरवत दुसऱ्यांदा हा खिताब आपल्या नावे केला. २४वेळा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविचला गेल्या वर्षी विम्बल्डनच्या फायनलमध्ये अल्काराजने हरवले होते.
कार्लोस अल्काराजने २०२४च्या फायनल सामन्यात जोकोविचविरुद्ध पहिले २ सेट अगदी सहज जिंकले होते. पहिले दोन सेट त्याने ६-२, ६-२ असे जिंकले मात्र तिसऱ्या सेटसाठी त्याला खूप झुंजावे लागले. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत पोहोचला. यात २१ वर्षीय कार्लोसने बाजी मारली. तसेच यासोबतच करिअरमधील चौथे ग्रँडस्लॅम जिंकले.
कार्लोसने केली रॉजर फेडररशी बरोबरी
कार्लोस अल्काराजने आपले चौथे ग्रँड स्लॅम खिताब जिंकत महान टेनिस खेळाडू रॉजर फेडररशी बरोबरी केली. फेडररनंतर कार्लोस अल्काराज असा पहिला टेनिस खेळाडू बनला आहे ज्याने करिअरमध्ये पहिले चार ग्रँड स्लॅम फायनल सामने जिंकत विजय मिळवला आहे. कार्लोस आतापर्यंत २ वेळा विम्बल्डन, एकदा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तसेच चारही ठिकाणी त्याने विजय मिळवला आहे.