साप्ताहिक राशिभविष्य, १४ ते २० जुलै २०२४
![]() |
कार्यक्षमता भरपूर वाढणारमेष : आपली कार्यक्षमता भरपूर वाढणार आहे. कामात अपेक्षेपेक्षा प्रगती होणार आहे. जी कामे आपली थांबली होती ती कामे होण्यास सुरुवात होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रलोभन टाळणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना शेअर मार्केटमध्ये किंवा लॉटरी यापासून लांब राहणे आवश्यक आहे. कोणत्याही बाबतीत निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ती खऱ्या प्रेमाच्या शोधात होत्या, त्यांचा शोध पूर्ण होईल. विवाह ठरविण्यास हा कालावधी चांगला आहे. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे नोकरी व्यवसायातील लोकांना चांगला दिलासा मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. |
![]() |
संपत्ती-ज्ञानामध्ये भरवृषभ : कामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे. आपली प्रतिष्ठा उंचावणार आहे. त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार होणार आहे. आपल्या संपत्तीमध्ये, ज्ञानामध्ये भर पडणार आहे. आपल्या वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टी राहणार आहे. या कालावधीत होणारा प्रवास आपल्यासाठी फलदायी होणार आहे. प्रवासामध्ये तत्त्वज्ञान आणि दूरदृष्टीमध्ये वाढ होणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या किंवा कौटुंबिक पातळीवर आपल्या जबाबदाऱ्या आपण चांगल्या तऱ्हेने पार पाडणार आहात. व्यावसायिक भागीदारीमुळे तुमच्यासमोर छोट्या-मोठ्या समस्या उभ्या राहतील. |
![]() |
विवाह प्रस्ताव येतीलमिथुन : आपला आत्मविश्वास चांगला राहणार आहे. आपली बुद्धी आणि विचार सकारात्मक राहणार आहे. आपले कौटुंबिक प्रश्न चांगल्या तऱ्हेने सोडवणार आहात. विवाहयोग्य व्यक्तींना एकापेक्षा जास्त प्रस्ताव आपल्यासमोर येणार आहेत. नोकरी-व्यवसाय यांमध्ये सुद्धा आपल्याला नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. हे प्रवास आपल्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. |
![]() |
सावधानता बाळगाकर्क : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण सर्व तऱ्हेने दक्ष असले पाहिजे. आधीच परिस्थिती फारशी अनुकूल नाही आहे, त्यामुळे सावध पावले उचलली पाहिजेत. पण आपण आपल्या हुशारीवर व कार्यकुशलतेने सर्व परिस्थिती धैर्याने आणि विवेकाने सांभाळणार आहात. आपणास जर गुंतवणूक करायची असल्यास शेअर मार्केट किंवा अशाच संबंधी गुंतवणूक करू नका. जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर सोने किंवा स्थिर मालमत्तेत केल्यास फायदा होईल. |
![]() |
उत्तम संवाद कौशल्यसिंह : आपल्याकडे असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वतःकडे आकृष्ट करणार आहात. आर्थिकदृष्ट्या हा चांगला काळ आहे. आपल्याकडे अतिशय उत्तम संवाद कौशल्य असणार आहे. या कालावधीमध्ये चांगला आर्थिक मोबदला मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणाची परिस्थिती नक्की सुधारणार आहे. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला सर्वप्रकारे मदत मिळण्याची शक्यता आहे. आपली बचतही होऊ शकते. आपल्याला नवीन संधी येऊ शकतात. नवीन करार आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात. |
![]() |
विरोधकांवर मात करू शकताकन्या : सप्ताहाच्या सुरुवातीला कामामध्ये खूपच धावपळ असणार आहे. व्यापार व्यवसायासाठी आपल्याला एखाद्या वेळेस शहराबाहेर जावे लागणार आहे. त्याच वेळेस नेमके एखाद्या घरातले महत्त्वाचे काम, एखाद्याच्या आजारपण समोर येणार आहे. आपली कुचंबणा होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कामामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन काम केले, तर चांगला फायदा होईल. आपल्या सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. विरोधकांवर मात करू शकता. सृजनशील क्षमतांचा वापर करून अपेक्षित बदल करू शकता. |
![]() |
आव्हानांवर मात करालतूळ : तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवणार आहात. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील. कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असणार आहात. हा कालावधी आपणास उत्पन्न मिळवून देणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आपल्या नातेवाइकांमुळे काही तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांची तुमचा सुसंवाद असू द्यावा. |
![]() |
नशिबाची साथ मिळेलवृश्चिक : नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्यामुळे तुमचे व्यस्त जीवन सकारात्मक राहील. जोडीदाराच्या माध्यमातून आपणास लाभ होणार आहे. प्रवास होतील. नवीन उद्योगाची सुरुवातही होऊ शकते. नातेवाईक किंवा सगेसोयरे यांच्याशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भागीदार आणि सहकार्य यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आपण दक्ष असावे. एखाद्या तीर्थक्षेत्राला आपण भेट देण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होतील. व्यापार व्यवसायातून आर्थिक लाभ होणार आहे. |
![]() |
सामंजस्याचे संबंधधनु : परिवारातील व्यक्तींचे सामंजस्याचे संबंध असणार आहेत. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध निर्माण होतील. प्रेमी युगुलांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. ज्ञानार्जन, प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. आपले जीवन अधिक स्थिर होणार आहे. व्यावसायिकाने खासगी आयुष्यात समतोल साधा आणि आयुष्याच्या दोन्ही महत्त्वाच्या अंगाकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरविणार आहात. आपल्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी आपणास इतरांची मदत मिळेल. |
![]() |
नव्या संधी मिळणार आहेतमकर : संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळणार आहेत. त्यातून तुम्ही व्यवसायात विस्तार करू शकता. तुमचे धाडस, तुमची बुद्धिमत्ता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही वरची पातळी गाठणार आहात. कौटुंबिक आयुष्यात एकोपा राहणार आहे. आरोग्याच्या छोट्याशा कुरबुरी राहणार आहेत. कष्टाचा मोबदला मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी होण्याचे ग्रहमान आहे. कापणे, भाजण्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. भागीदारी आणि सहकाऱ्यांकडून लाभ होतील. |
![]() |
कष्टाचे चीज होईलकुंभ : तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेएवढे काम करत आहात. हे दुसऱ्याला प्रेरणा मिळण्यासारखे आपल्याकडे गुण आहेत. प्रवास करण्याचा हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग तुम्ही घेणार आहात. तुम्ही यशाची फळे चाखू शकणार आहात. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात येणार आहात. तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आपल्या कल्पकतेची प्रशंसा होणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. आरोग्याच्या कुरबुरीमुळे मनस्ताप होणार आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. या सर्वांपासून दक्ष राहणे आपणास आवश्यक आहे. |
![]() |
अनपेक्षित बदलमीन : मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होणार आहे. त्यासाठी हा कालावधी चांगला आहे. आर्थिक वादाचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. बऱ्याच दिवसांपासून पगारवाढीची अपेक्षा आहे. ती आता या वेळेला पूर्ण होऊ शकते. आरामदायी वस्तूवर तुम्ही खर्च करणार आहात. आपण या कालावधीमध्ये सर्जनशील क्षमतांचा उपयोग करू शकता. आपण चांगल्या तऱ्हेने व्यक्त होऊ शकता. कार्यक्षेत्रामध्ये अनपेक्षित बदल होणार आहे. ते आपणासाठी अत्यंत लाभकारी असणार आहेत. आपली सकारात्मकता हेच त्याचे कारण आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. |