मुंबई: टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रचंड उकाडा आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे या भाज्यांचे दर चांगलेच वाढले होते. आता सरकारने आशा व्यक्त केली आहे की या स्थितीत सुधारणा होऊ शकते. तसेच लवकरच या किंमती कमी होऊ शकतात.
दक्षिण भारतातील राज्यांमधून होणारा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. अशातच टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.
पुरवठा कमी झाल्याने दर वाढले
सरकारी आकड्यांनुसार, दिल्लीत टोमॅटोचे रिटेल दर ७५ रूपये प्रति किलो, मुंबईत ८३ रूपये प्रति किलो आणि कोलकातामध्ये ८० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या किंमती पुरवठ्यामुळे वाढत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की दिल्ली आण अनेक शहरांमध्ये टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती वाढत आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या बटाटा २८३ लाख टन स्टोर्समध्ये आहे. गेल्या वर्षीत्या तुलनेत कमी उत्पादनानंतरही यामुळे अंतर्गत मागणी पूर्ण केली जाऊ शकते.