Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Anant-Radhika Wedding : अनंत राधिकाच्या लग्नात आले 'बिन बुलाए मेहमान'

Anant-Radhika Wedding : अनंत राधिकाच्या लग्नात आले 'बिन बुलाए मेहमान'

दोघांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika Wedding) यांचा १२ जुलै रोजी शानदार विवाह सोहळा पार पडला. हा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.


दरम्यान या लग्नसोहळ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीजण लग्नातील जेवणासाठी तर काही गंमत म्हणून दुसऱ्यांच्या लग्नात बिन बुलाए मेहमान बनून हजेरी लावतात. असाच प्रकार चक्क अनंत राधिकाच्या लग्नातही घडल्याचे समोर आले आहे. लग्नसोहळ्याला आलेल्या या व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानींच्या बहुचर्चित लग्न सोहळ्यामध्ये युट्युबर (Youtuber) आणि आणखी एकाने निमंत्रण न मिळताही हजेरी लावल्याचे समोर आले आहे. यूट्यूबर व्यंकटेश अलुरी आणि व्यावसायिक (Commercial) लुकमन मोहम्मद शेख या दोघांनी अनंत राधिकाच्या लग्नात अवैधरित्या प्रवेश केला होता. युट्यूबर असलेल्या अलुरीने युट्यूबसाठी कंटेंट जमा करण्यासाठी तर लुकमन मोहम्मद शेखने औत्सुक्यापोटी प्रवेश केला. मात्र या दोघांनाही लग्नसोहळ्याला उपस्थिती लावणे चांगलेच महागात पडले आहे.


या दोघांनाही बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात ट्रेसा पासिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या दोघांची पोलीस कडक चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment