Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीDonald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरचा मृत्यू!

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरचा मृत्यू!

जाणून घ्या रॅलीत नेमके काय घडले

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या १३ जुलै रोजी झालेल्या निवडणूक रॅलीत गोळीबार (Rally Assassination Attempt) झाला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. एफबीआयकडून (FBI) हा हत्येचा प्रयत्न होता, याबाबत दुजोरा देण्यात आला. या हल्ल्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जखमी झाल्यामुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या हल्ल्यादरम्यान गोळीबार करणाऱ्या शूटरसह दोघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्वेनियाच्या बटलर शहरात निवडणुकीच्या रॅलीमध्ये संबोधित करण्यासाठी आले होते. तेथे रिपब्लिकन पक्षाकडून ते राष्ट्रपती पदासाठी दावेदार आहेत. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता त्यांनी आपल्या भाषणास सुरूवात करताच त्यांच्यावर गोळीबाराचा हल्ला केला गेला. या घटनेत ट्रम्प यांच्या उजव्या कानावरील डोक्याचा भाग रक्तबंबाळ झाला. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये माजी राष्ट्रपतींच्या दिशेने गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोराचा समावेश आहे.

घटनेचा कडक तपास

सिक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक कायद्याची अंमलबजावणी यांच्या मदतीने एफबीआय गोळीबाराच्या तपासाचे नेतृत्व करत आहे. हत्येचा प्रयत्न म्हणून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे राजकीय हिंसाचार आणि सार्वजनिक व्यक्तींच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. यामुळे राजकीय वक्तृत्वाचा टोन आणि सार्वजनिक सभ्यतेची गरज याविषयी व्यापक वादविवादही सुरू झाले आहेत.

जो बायडेन काय म्हणाले?

राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या घटनेनंतर ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि हल्ल्याचा निषेध केला. पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो आणि सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनीही हिंसाचाराचा निषेध केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -