मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाचवा टी-२० सामना भारताने ४२ धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने ही मालिका ४-१ने जिंकली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १६७ धावा केल्या. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतक ठोकले,
त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ५८ धावा केल्या. सॅमसनने या खेळी दरम्यान ४ षटकार आणि एक चौकार ठोकला. रियान परागने २२ धावांची खेळी केली. शिवम दुबेने २६ धावा केल्या.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाला १२५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून फराज अकरमने १३ बॉलमध्ये २७ धावा केल्या. मेयर्सने ३४ धावांची खेळी केली. मरूमानीने २७ धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने २२ धावा देत सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या. याशिवाय शिवम दुबेने २ विकेट मिळवल्या. तुषार देशपांडे, अभिषेक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.