Monday, May 19, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

तरणखोप येथे भंगार गोडाऊनला भर पावसात भीषण आग

तरणखोप येथे भंगार गोडाऊनला भर पावसात भीषण आग

पेण(देवा पेरवी)- मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप गावाच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल शुभलक्ष्मी जवळील भंगारच्या गोडाऊनला मध्यरात्री 2 च्या सुमारास भर पावसात भीषण आग लागली. या आगीत भंगार व इतर सामान जळून खाक झाले.


आग लागल्याचे कळताच अपघातग्रस्तांचे वाली देवदूत कल्पेश ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारणा केली. त्यांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठी हानी टळली.
घटनास्थळी पेण पोलीसही पोहचले. भर पावसात लागलेली आग अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली.

Comments
Add Comment