Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNutrition Food : लहानग्यांच्या जीवाशी खेळ! शालेय पोषण आहारात मृत बेडूक

Nutrition Food : लहानग्यांच्या जीवाशी खेळ! शालेय पोषण आहारात मृत बेडूक

ग्रामस्थांनी विचारला प्रशासनाला जाब

पंढरपूर : मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार (Nutrition Food) पुरवला जात आहे. मात्र शालेय पोषण आहारात सातत्याने अळ्या, किडे, झुरळ, उंदराच्या लेंड्या अशा धक्कादायक गोष्टी आढळत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली येथील गर्भवती महिला व बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात मृत वाळा सापाचं पिलू आढळलं होतं.

या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी अशीच एक घटना पंढरपूर (Pandharpur News) येथे घडली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या शाळेत एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसे नगर येथील अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क बेडकाचे मृत पिल्लू (Dead Baby Frog) सापडले आहे. या धक्कादायक घटनेमुळे लहानग्या जीवांशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शालेय पोषण आहारात अशाप्रकारे मेलेला प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांतून याआधीदेखील असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला का? असा प्रश्न पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेतून दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -