Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न'

'मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न'

मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा


मुंबई : महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचे माझे स्वप्न आहे. त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझे स्वप्न आहे. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास, समृद्ध भविष्य आणि कृषी क्षेत्राची क्षमता आहे. एनडीए सरकारचे स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पटीने अधिक काम करणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले. या दौऱ्यादरम्यान राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी मुंबईकरांना मराठीतून नमस्कार म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छाही दिल्या. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडला. यावेळी तब्बल ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले.



विविध योजनांची दिली पंतप्रधानांना माहिती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर, राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे म्हटले. यावेळी, भाषण करताना नरेंद्र मोदींनी पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटले की, येथील ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे. मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा देशातील लोकांनी आमचे स्वागत केले असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.



१० लाखांपेक्षा अधिक जणांना मिळणार रोजगार


यावेळी, पंतप्रधानांनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम असल्याचे सांगत मोदी पुढे म्हणाले की, अशा महाराष्ट्र राज्याची विकासाची क्षमता आणखी वाढवण्यासाठी आणि मुंबई तसेच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी अनेक प्रकल्प मुंबई तसेच राज्यात हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई आणि आजुबाजुचा परिसर जोडला जाईल. या प्रकल्पामुळे १० लाखांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळेल. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.



मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा शुभारंभ केला. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन त्यांनी केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्मचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्मचे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पण केले.



सह्याद्रीच्या डोंगरावर फिरण्याची वेगळी अनुभूती


पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेले किल्ले आहेत, कोकणातले टूरिझम आहे, समुद्राच्या तळाचे मनमोहक दृष्ट आहे, सह्याद्रीच्या डोंगरावर फिरण्याची वेगळी अनुभूती आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मुंबईमध्ये १० वर्षांपूर्वी आठ किलोमीटर मेट्रो रेल्वे झाली होती. आज मुंबई मेट्रो ८० किलोमीटरपर्यंत गेली आहे. पुढेही २०० किलोमीटरपर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. मागच्या दहा वर्षात महाराष्ट्रात नॅशनल हायवेची लांबी वाढून तीनपट झाली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट हा प्रगती आणि प्रकृतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ठाणे ते बोरीवली रस्त्याचे कामही सुरु आहे.

Comments
Add Comment