Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमNashik News : अबब! नाशिकमध्ये आढळला तब्बल ३१४ किलो बनावट पनीरचा साठा

Nashik News : अबब! नाशिकमध्ये आढळला तब्बल ३१४ किलो बनावट पनीरचा साठा

नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने सापळा रचून टाकली धाड

नाशिक : भेसळयुक्त पदार्थांची (Adulterated substances) विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. विक्रेते आपल्या फायद्यासाठी भेसळयुक्त पदार्थ विकतात मात्र ते खाणाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अशातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी (Nashik news) समोर आली आहे. नाशिकच्या एका दूध कंपनीकडे तब्बल ३१४ किलो पनीरचा साठा आढळला. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) हा साठा तसेच भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यालयास सिन्नर (Sinnar) येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील (Musalgaon MIDC) दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशवी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस (Yashvi Milk and Milk Products) विषयी गुप्त माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड (Raid) टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सखोल तपासणी केली असता यावेळी ५३ हजार ३८० रुपये किंमतीच्या ३१४ किलो भेसळयुक्त पनीरचा (Fake Paneer) साठा जप्त करण्यात आला. तसेच पनीर बनविण्यासाठी रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करण्यात येत होता. त्यांचे नमुने घेवून हा साठा जप्त केला आहे.

ही कारवाई सहआयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विसपुते, वाहनचालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -