Monday, May 12, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Vidhanparishad Election : महायुतीचा डाव! मतदानादिवशीच मविआचे आमदार फुटणार?

Vidhanparishad Election : महायुतीचा डाव! मतदानादिवशीच मविआचे आमदार फुटणार?

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक


मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी (Vidhanparishad Election) आज मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) मोठा डाव टाकला असल्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशीच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काही आमदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आज मविआला मोठा धक्का बसू शकतो.


मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीने निवडणुकीआधी महाविकास आघाडीचे अनेक आमदार आपल्या गळाला लावल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar group) काँग्रेसचे (Congress) तब्बल ५ आमदार फोडल्याचं सांगितलं जातंय. तर भाजपकडून (BJP) देखील काँग्रेसचे ४ आमदार फोडण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच काँग्रेसचे तब्बल ८ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे.


विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे स्वतःचे ४० आमदार, दोन अपक्ष आमदार, अशी एकूण ४२ मते आहेत.


काँग्रेसच्या जर ४ आमदारांनी अजित पवारांना मतदान केलं तर त्यांच्याकडे ४६ मतं असू शकतील. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार फर्स्ट प्रेफरन्समध्येच निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुती? नेमका कुणाचा उमेदवार पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment