मुंबई: टेनिस स्टार जास्मिन पाओलिनीने विम्बल्डनमध्ये इतिहास रचला आहे. ती अंतिम फेरीत दाखल झालेली इटलीची पहिली स्टार खेळाडू ठरली आहे. गुरूवारी खेळवण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सातव्या सीडेड जास्मिनने क्रोएशियाच्या स्टार डोना वेकिचला २-६, ६-४, ७-६ असे हरवले.
जास्मिन आणि डोना यांच्यातील हा सामना तब्बल २ तास ५१ मिनिटांपर्यंत सुरू होता. विम्बल्डनच्या इतिहासात सगळ्यात जास्त वेळ चालणारा हा सेमीफायनलचा सामना ठरला.
जास्मिनने या विजयासह आणखी एका रेकॉर्डच्या बाबतीत टेनिस स्टार सेरेना विल्यम्सशी बरोबरी केली आहे. खरंतर जास्मिनने विम्बल्डनच्या आधी फ्रेंच ओपन २०२४च्या फायनलमध्येही स्थान मिळवले होते. मात्र तेथे तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.
याच पद्धतीने एकाच हंगामात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये खेळणारी सेरेनानंतर ती दुसरी खेळाडू ठरली आहे.