मुंबई: झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया(team india) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेत भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितकेच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असू शकतो. तर जसप्रीत बुमराहला या मालिकेत आराम मिळू शकतो. याशिवाय शिवम दुबेही या मालिकेतून बाहेर होऊ शकतो.
झिम्बाब्वेविरुद्ध संघाबाबत बोलायचे झाल्यास अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडे यांना श्रीलंकेचे तिकीट मिळणे मुश्किल आहे. खरंतर, २०२६टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता श्रीलंकेविरुद् भारताच्या १५ सदस्यीय संघाची निवड केली जाऊ शकते. विश्वविजेता संघाचे सदस्य ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह श्रीलंका मालिकेत खेळताना दिसू शकतात.
प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार हार्दिकच्या दौऱ्याची होऊ शकते सुरूवात
टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर आता टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक आहेत. तर रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्या नवा टी-२० कर्णधार घोषित होऊ शकतो. ऋषभ पंतही कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. खरंतर हार्दिक सतत दुखापतग्रस्त झाल्यास कर्णधार बनण्यामध्ये अडथळा येऊ शकतो.
श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ
शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), संजू सॅमसन(विकेटकीपर), हार्दिक पांड्या(कर्णधार), रिंकु सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद/मुकेश कुमार.