
मुंबई: अळीवाच्या बिया भारतीय जेवणातील मुख्य पदार्थ आहे. खासकरून डिलीव्हरीनंतर महिलांना अळीवाचे लाडू दिले जातात. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जर एखाद्याच्या शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल तर हे नक्की खाल्ले पाहिजे.
अळीवामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. दरम्यान, अळीव हे उष्ण असतात त्यामुळे अधिक प्रमाणात खाऊ नयेत. थंडीच्या दिवसाता साधारणपणे अळीव खाल्ले जातात. मात्र थोड्या प्रमाणात हे या हंगामात हे खाऊ शकता.
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांनी जरूर खावे अळीव
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्यांनी अळीव जरूर खाल्ले पाहिजेत. यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अळीव दररोज खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. तसेच अॅनिमियाचा त्रास दूर होतो. याचमुळे गर्भवती महिलांना डिलीव्हरीनंतर अळीव खायला दिले जातात.
भारतीय महिलांमध्ये रक्ताची कमतरता ही मोठी समस्या आहे. यासाठी खासकरून महिलांनी दररोज एक चमचा अळीव खाल्ले पाहिजे. १ चमचा अळीवाच्या बियांमध्ये १२ मिलीग्रॅम आर्यन असतात.