Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीBank Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १००हून अधिक पदांची मेगाभरती!

Bank Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १००हून अधिक पदांची मेगाभरती!

मुंबई : सध्या अनेक तरुणांना सरकारी बँकेत नोकरी (Bank Job) करण्यासाठी संधी हवी असते. अशाच इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) १०० हून अधिक विविध पदांसाठी भरती जारी केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ११५ पदांची भरती करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२४ आहे, त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, अशी अधिसूचना जारी केली आहे.

‘या’ पदांची भरती

इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ विभागांसाठी भरती सुरू आहे. या विभागांमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर आणि इतर पदांसाठी रिक्त जागा भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदानुसार पदवी/मास्टर्स/पोस्ट ग्रॅज्युएशन/बी टेक/बीई इ. पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार कामाचा अनुभवही मागवण्यात आला आहे.

‘असा’ करा अर्ज

भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवारांना प्रथम अधिकृत अधिसूचनेची PDF डाउनलोड करावी लागेल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना महत्त्वाची कागदपत्रे आणि अर्ज शुल्काचा डिमांड ड्राफ्ट जोडून स्पीड पोस्टद्वारे बँकेकडे पाठवावा लागेल.

महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोक मंगल’ १५०१, शिवाजी नगर, पुणे या पत्त्यावर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.

त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि उमेदवाराची निवड ही केली जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -