Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAnant-Radhika wedding : अंबानींचा लग्नसमारंभ, मुंबईकरांसाठी 'या' वाटा बंद!

Anant-Radhika wedding : अंबानींचा लग्नसमारंभ, मुंबईकरांसाठी ‘या’ वाटा बंद!

जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग…

बीकेसी परिसरातील कर्मचाऱ्यांनाही आज वर्क फ्रॉम होम

मुंबई : सध्या सर्वत्र अंबानींच्या लग्नसमारंभाची जोरदार चर्चा सुरु आहे. मुकेश अंबानींचा लेक अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंटसोबत आज विवाहसोहळा (Anant Ambani-Radhika Merchant wedding) पार पडणार आहे. यासाठी बॉलिवूडसह (Bollywood) देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी पाहुणेमंडळी हजर झाली आहेत. त्यांच्या पाहुणचारासाठी अंबानी कुटुंब सज्ज झाले आहे. वांद्रे येथील बीकेसीमधील (BKC) जिओ वर्ल्ड सेंटरला (Jio World Centre) हा विवाहसोहळा होणार आहे. या शाही समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईकरांना मात्र याचा काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १२ जुलै ते १५ जुलै या दरम्यान संपन्न होतील. एकूण तीन दिवस पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.

बीकेसी परिसरातील कर्मचाऱ्यांना आज वर्क फ्रॉम होम

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या लग्नसोहळ्यामुळे बीकेसीकडे जाणारे अनेक मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय या परिसरातील बहुतांश कंपन्यांनी आज कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची (Work from home) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कोणते मार्ग बंद राहणार?

मुंबई ट्राफिक पोलिसांनी यासंदर्भात एक्स पोस्ट शेअर करत कोणते मार्ग बंद असतील आणि नागरिक प्रवासासाठी कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करू शकतात यासंदर्भात माहिती दिली आहे. १२ जुलैपासून ते १५ जुलै रात्री १२ पर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात येईल असं वाहतूक पोलिसांनी एक्स पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं होतं. या लग्नाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमधील अनेक मार्ग वाहनांच्या रहदारीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

१. प्रवेश बंद मार्ग :- लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून, धिरूबाई अंबानी स्क्वेअर अॅव्हेन्यू लेन-३ मार्गे इंडीयन ऑईल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन तसेच एमटीएनएल कार्यालयाकडून कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग :- वन बीकेसीकडून येणारी वाहतूक लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून डावे वळण घेऊन पुढे डायमंड डायमंड जंक्शन येथून उजवे वळण घेत धिरुबाई अंबानी स्क्वेअर येथून बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.

२. बंद मार्ग : कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन व बीकेसी परिसरातील सर्व वाहनांना बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्याकरीता धिरुभाई अंबानी स्क्वेअर येथून (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग – कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शन डावे वळण व डायमंड गेट नं.८. समोरून लक्ष्मीटॉवर जंक्शन येथून उजवे वळण घेत बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.

३. प्रवेश बंद मार्ग – भारत नगर, वन बीकेसी (कार्यकमाकरीता देणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना जिओ कन्वेंशन सेंटर गेट क्र. २३ येथून जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग – कौटील्य भवन येथून उजवे वळण घेतल्यावर पुढे अॅव्हेण्यु १ रोडने वाहनं धिरुभाई अंबानी स्कूल येथून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

४. प्रवेश बंद मार्ग – एमटीएनएल जंक्शन येथून (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना सिग्नेचर/समटेक बिल्डींग येथून जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर, बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग :- धिरुभाई अंबानी स्कूलकडून डावे वळण घेऊन अॅव्हेण्यु १ रोडने पुढे गोदरेज बीकेसीच्या दिशेने जाऊन वाहनं इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

एकदिशा मार्ग

१) लतीका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत जाणारा मार्ग वाहतुकीसाठी एक दिशा ( वनवे ) करण्यात येत आहे.

२) अॅव्हेन्यु ३ रोड हा कौटील्य भवन ते अमेरीकन दूतावास जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -