Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLadaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा तुम्ही स्वतःच भरू शकता तुमचा...

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा तुम्ही स्वतःच भरू शकता तुमचा फॉर्म

मोबाईलमधील ॲपच्या मदतीने फॉर्म भरता येतो, या सोप्या टिप्स फॉलो करा…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

परंतु, अर्ज करण्यास सुरुवात झालेली असली तरी शासनाने घातलेल्या काही अटी, नियमांमुळे महिलांची तारांबळ उडत आहेत. फॉर्म नेमका कुठे भरावा, त्यासाठी काय-काय कागदपत्रे लागतात? असे महिलांकडून विचारले जात आहे. नारीशक्ती योजना दूत या ॲपच्या माध्यमातूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येतो.

दरम्यान, Ladaki Bahin Yojana या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

> ॲप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

> ॲपमध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा.

> ॲपमध्ये गेल्यावर सर्वात खाली ४ मेनू दिसतील. त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लिक करावे.

> क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर क्लीक करा.

> फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी.

> माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.

> त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.

> सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना –

> अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)

> उत्पन्न प्रमाणपत्रमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड.

> हमीपत्र .

> बँक पासबुक.

> सध्याचा LIVE फोटो.

> वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.

> त्यानंतर खाली Accept करावे.

> माहिती जतन करा वर क्लिक करा.

> थोडा वेळ थांबा….तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल.

> ४ अंकी OTP टाका.

> फॉर्म सबमिट करा.

> आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.

> आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅबवर क्लीक करा.

> तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला समजू शकते. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: pending मध्ये दिसेल.

अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -