मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवणारे कोच राहुल द्रविड यांचा करार या स्पर्धेसोबत संपला होता. त्यांच्याकडून हे ही स्पष्ट करण्यात आले होते की आता त्यांना कार्यकाळ वाढवून घ्यायचा नाही आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर असतील अशी घोषणा मंगळवारी ९ जुलैला बीसीसीआयकडून करण्यात आली. आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न जरूर असेल की द्रविडची जागा घेणार्या धुरंधर क्रिकेटरचा पगार त्याच्यापेक्षा जास्त असेल का कमी?
मंगळवार भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे गंभीरची नियुक्ती केल्याची घोषणा मंगळवारी केली. दरम्यान, गंभीरची निवड केली जाणार असे अनुमान आधीपासूनच लावले जात होते. दरम्यान, गंभीरचा पगार अजून ठरणे बाकी आहे. मात्र माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्याइतकाच त्यांचा पगार असण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून वार्षिक १२ कोटी रूपये पगार दिला जात होता. गंभीरचाही पगार तितकाच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमसाठी जबाबदारी सांभाळणे अधिक महत्त्वाचे होते. पगार आणि इतर गोष्टींवर काम केले जाऊ शकते. २०१४मध्ये रवी शास्त्री यांनी पदभार सांभाळला होता तेव्हा त्यांचा करार करण्यात आला नव्हता. नंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गौतमच्या बाबतीतही काही बारीक बाबींवर काम केले जात आहे. त्याचा पगार राहुल द्रविड यांच्याइतकाच असेल.