मुंबई: वास्तुमध्ये दिशेला मोठे महत्त्व आहे. वास्तुमध्ये सांगण्यात आलेल्या ८ दिशा आपल्या जीवनाची दशा बदलू शकतात. याच कारणामुळे आपल्या घराच्या निर्मितीमध्ये पूजेचे घर, किचन तसेच इतर अनेक बाबींबद्दल महत्त्वाचे सांगण्यात आले आहे.
वास्तुनुसार महिलांना कोणत्या दिशेला पाय करून झोपले हे ही सांगण्यात आले आहे. याचे पालन करणाऱ्यांना करिअरमध्ये अडथळे येत नाहीत. तसेच सुख-समृद्धी धनाची कमतरता राहत नाही. आरोग्यही चांगले राहते. झोपताना कोणत्या दिशेला तोंड आणि कोणत्या दिशेला पाय करायला हवेत हे जाणून घ्या…
महिलांनी कोणत्या दिशेला पाय करून झोपले पाहिजे?
उत्तर-दक्षिण – महिलांना घरची लक्ष्मी म्हटले जाते. वास्तुमध्ये सांगितल्यानुसार झोपताना स्त्रियांचे पाय उत्तर दिशेला तर डोके दक्षिण दिशेला असले पाहिजे. यामुळे जीवन सुखमय होते. घरात लक्ष्मीचा वास राहतो. नेहमी भरभराट होते. घरात सुख-समृद्धीची कमतरता येत नाही.
पूर्व-पश्चिम – तर उत्तर-दक्षिण बेड ठेवू शकत नसाल तर पूर्व दिशेला डोके आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपले पाहिजे. पूर्व दिशेला सूर्योदय होतो. यामुळे जीवनात सकारात्मकता राहते. ज्ञान वाढते. आरोग्याचे फायदे मिळतात.
कोणत्या दिशेला झोपले नाही पाहिजे
कधीही पूर्व अथवा दक्षिण दिशेला पाय करून झोपले नाही पाहिजे. जर तुम्ही असे करत आहात तर तुम्हाला आरोग्यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच नकारात्मक विचार मनात घर करू लागतात. मंगळ दोष उत्पन्न होऊ शकतो.
काय आहे झोपण्याची योग्य वेळ?
शास्त्रानुसार व्यक्तीला सूर्योदयाच्या आधी उठले पाहिजे. सूर्योदय झाल्यानंतर उशिरापर्यंत झोपू नये. यामुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही धन वृद्धीही थांबते. संध्याकाळच्या वेळेस झोपणे शुभ मानले जाते.