समर्थ कृपा – विलास खानोलकर
नारायण नामे होता भक्त
पूजा करता विनवी भक्त ।।१।।
सर्वत्र करतो वर्षाव पाऊस
कधी होणार सुखाचा पाऊस ।।२।।
कशी फिटणार मानवाची सुखाची हौस
दिनरात अभ्यासूनी थकले बालहंस ।।३।।
तरुणांची दारू करी विध्वंस
जुगार, नशा, वेग अति विध्वंस ।।४।।
मोबाईल टी.व्ही., प्रचंड विध्वंस
आधुनिक संदेश द्या! विश्वास! ।।५।।
रोज १०० अपघात गरिबांनाच त्रास
संदेश द्यावा! सुरू आता श्रावणमास ।।६।।
स्वामी वदे पाऊस हाच ईश्वरी आशीर्वाद
स्वामींचाच रंगीत आशीर्वाद ।।७।।
स्वर्गीय आनंदाचा पाऊस
फिटे साऱ्या पृथ्वीची हौस ।।८।।
वाहती प्रेमभरे नद्या नाले
हिरवी पाने नव्हाळी न्हाले ।।९।।
गुलाब मोगरा सुगंध प्याले
चाफा सोनचाफा सुवर्णगंध व्याले।।१०।।
हिरवी शेती, मृदगंध न्हाले
प्रत्येक वाफा सुगंधाचे प्याले ।।११।।
सर्वत्र भरून वाहे ईश्वरी प्रवाह
डोंगर नदी नाले बोलती वाह ! वाह ।।१२।।
झरे मारती टुण टुण उड्या
शेतकरी म्हणती गाव बरा गड्या ।।१३।।
गाई वासरे मारती उड्या
हरीण पाडसे मारी उड्या ।।१४।।
ससे खारी आनंदी उड्या
डोलत चालती कासव गड्या ।।१५।।
धबा धबा कोसळे तोय पाणी
ईश्वरी आशीर्वाद गात गाणी ।।१६।।
स्वामी असाच द्या पाऊस
चिमणी बदकाची फिटू द्या हौस ।।१७।।
टप टप टप टप वाजे पत्रा
चिमण्या येती घरात सत्रा ।।१८।।
संगीतात त्या वाटे आली जत्रा
सुखाला, आनंदाला नाही खत्रा ।।१९।।
कौल झोपडी थोडी थोडी गळे
आनंदाचे अश्रू वाटे ती पाघळे ।।२०।।
कौलातून मृदगंधाचे सुगंध ओघळे
नदी गळामिठी सागर भेटीस पळे ।।२१।।
नाचे पोपट मैना आनंद भरे
कोकिळा आनंदे गाई गळाभरे ।।२२।।
देवळाच्या गाभाऱ्याचा सुगंधी गारवा
जादुई सुगंधाचा केवढा अन् मारवा ।।२३।।
तुळशी दुरवा जास्वंद बट मोगरा
जाई जुई शेवंतीत राजा मोगरा ।।२४।।
तुळशी कापुरांचे पिता स्वामी तीर्थ
आठवती स्वर्ग लोकीची तीर्थ ।।२५।।
करा रोज वरिष्ठांना नमस्कार
तोच पोचे ईश्वराला नमस्कार ।।२६।।
करता गाईला नमस्कार
पोचे आजी पणजीला नमस्कार ।।२७।।
मठातूनी आशीर्वाद देता स्वामी
हम गया नही जिंदा है स्वामी ।।२८।।
प्राणीमात्र जिवंत नातू पणतूत
विसरती सारे कडा कडा भांडणात ।।२९।।
प्रेमळ ते आजी आजोबा गजोबा
आशीर्वाद देती स्वर्गातूनी पणजोबा ।।३०।।
न बोलता त्यांना कळते सारे
तरुणांसारखे चढत नाहीत पारे ।।३१।।
कढत अश्रू गिळती खारे
मुला सुनांना मी मी माझे प्यारे ।।३२।।
नको म्हाताऱ्या कोताऱ्याचे वारे
सारे काही माहेरचेच प्यारे ।।३३।।
पावला पावलाला करती अपमान
दिवसरात्र मोबाईलमध्ये मान ।।३४।।
झोमॅटो, स्वीगी खान पान
पिझा बर्गन तोंडात पान ।।३५।।
दिवसरात्र राजकारणी देती शिव्याशाप
जनताही करे तू तू मी मी आप ।।३६।।
दुराचारी घरात विंचू साप
स्वामी देती कानाखाली झाप ।।३७।।
खरे नको कोणास आईबाबा
हवेत बोगस जादू-टोण्यातले खोटे बाबा ।।३८।।
स्वतःच भांडती फिरती जगभर
मनशांतीसाठी फिरती विश्वंभर ।।३९।।
केल्या पंढरीच्या अनेक वाऱ्या
सुधारला नाही लाडका पोऱ्या।।४०।|
स्वामी म्हणे स्वतः आधी सुधरा
आहे ही आनंदाचीच वसुंधरा ।।४१।।
म्हणे स्वामी ! व्हा तुम्ही प्रेमळ बालके
भक्त गण हो पटकन सुधरून बालके ।।४२।।
स्वाम्ही म्हणे करा बकबक कमी
योगानाचे आदेश देतो आम्ही ।।४३।।
करा उपास इंस्टाग्रामचा
टाळा त्रास डोळ्यांचा नेटफ्लिक्सचा ।।४४।।
टाळा त्रास मेंदूरोग होण्याचा
टाळा त्रास हृदयदुखी, गुडघेदुखी होण्याचा ।।४५।।
व्यायाम करा भरपूर पळण्याचा
नियम घरातीलच डाळभात खाण्याचा ।।४६।।
१८ मारुती स्थापिले समर्थ
लाखो भाविक ज्ञानेश्वरी केले समर्थ ।।४७।।
तुम्हीही समाज करा समर्थ
स्वामी कृपेचा जगण्याचा हाच खरा अर्थ ।।४८।।
भक्तांनी करावे काम निस्वार्थ
हम गया नही जिंदा है हाच अर्थ ।।४९।।
दया, क्षमा, शांती, जीवनात अर्थ
हसत परोपकार सेवा हाच अर्थ ।।५०।।
मिटवून टाका काम, क्रोध स्वार्थ
श्रद्धा, सबुरी, आठवा श्रीकृष्ण पार्थ ।।५१।।
करा भरपूर दानधर्म, परमार्थ
भिऊ नको, मी पाठीशी! हाच परमार्थ ।। ५२ ।।
!! बोला स्वामीसमर्थ महाराज कि जय !!
[email protected]