Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडी१५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार २० पेक्षा अधिक OTT Apps ची सर्व्हिस

१५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार २० पेक्षा अधिक OTT Apps ची सर्व्हिस

मुंबई: आजकाल आपला आवडता कंटेट पाहण्यासाठी ओटीटी सर्व्हिसचे सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे झाले आहे. अनेक प्लान्स फ्रीमध्ये ओटीटी सेवा ऑफर करत आहेत. यामुळे युजर्सला आपले आवडते सिनेमे आणि मालिका पाहणे सोपे जाते. यातच एअरटेलने शानदार प्लान सादर केला आहे. यात १५० हून कमी किंमतीत २० पेक्षा अधिक ओटीटी सेवांची सर्व्हिस मिळणार आहे.

जर तुम्ही एअरटेल युजर आहात तसेच फायदेशीर किंमतीत ओटीटी सेवांचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही १४९ रूपयांचा प्लान एकदम योग्य पर्याय आहे. यात केवळ तुम्हाला डेटाच मिळणार नाही तर २०हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा कंटेटही पाहायला मिळेल.

एअरटेलचा नवा प्लान

भले टेलिकॉम कपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या असतील मात्र एअरटेलचा नवा प्लान खूप फायदेशीर आहे. एअरटेलने १४९ रूपयांचा एक नवा प्लान लाँच केला आहे. हा डेटा ओन्ली प्लान आहे. या प्लान तुम्ही सध्याच्या अॅक्टिव्ह प्लानसोबत रिचार्ज करू शकता. तसेच याचा लाभ उचलू शकता.

प्लानचे फायदे

या १४९ रूपयांच्या प्लानमध्ये १ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी तुमच्या सध्याच्या प्लान इतकी असेल. म्हणजेच तुमचा अॅक्टिव्ह प्लान ३० दिवसांसाठी व्हॅलिड असेल तर हा प्लान रिचार्ज केल्यास तुम्हाला ३० दिवसांसाठी १ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल.

Airtel Xstream Play २० पेक्षा अधिक ओटीटी सेवांचा कंटेट पाहण्याचा पर्याय मिळतो. यात Sony LIV, Lionsgate Play, Fancode, Eros Now, hoichoi, और ManoramaMAX या सेवांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -