मुंबई: मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. मुलांच्या मानसिक स्थितीवर आजूबाजूच्या परिस्थितीचाही परिणाम होतो. अभ्यासाचे प्रेशर, मित्रांचा दबाव आणि घरातील वातावरणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जर योग्य वेळेस लक्ष दिले नाही अथवा पावले उचलली नाहीत तर मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते.
अभ्यासाचा दबाव
मुलांवर अभ्यासाचा दबाव मोठा असते. आई-वडिलांच्या अपेक्षा, शाळेच्या मागण्या आणि समाजाचा दबाव यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यापासून बचावासाठी मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकू नका. त्यांच्या क्षमता समजून घ्या आणि वेळोवेळी त्यांना आराम द्या. अभ्यासासोबत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीसाठीही वेळ द्या.
कुटुंबातील वातावरण
कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. जर घरात सतत वाद तसेच तणाव असेल तर याचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे घरात शांतता आणि प्रेम असावे. मुलांच्यासमोर वाद घालू नका. कुटुंबाने एकत्र वेळ घालवावा. तसेच मुलांनाही आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या. यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि ते खुश राहतील.
सोशल मीडियाचा प्रभाव
मुलांवर मित्र आणि समाजाचा दबाव असतो. सोशल मीडियावर हा दबाव आणखी वाढतो. हा कमी करण्यासाठी मुलांशी खुलेपणाने बोला आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. दुसऱ्या मुलांशी सतत तुलना करू नका. ते जसे आहेत तसे स्वीकारा.