Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीAmbani : अंबानींच्या तीन मुलांमध्ये कोण आहे सगळ्यात श्रीमंत, किती आहे त्यांचे...

Ambani : अंबानींच्या तीन मुलांमध्ये कोण आहे सगळ्यात श्रीमंत, किती आहे त्यांचे शिक्षण, घ्या जाणून

मुंबई: मुकेश अंबानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतात. ते केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची गणती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होते.

मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीबद्दल सारेच जाणतात. त्यांची तीन मुले इशा अंबानी आणि दोन मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हेही अतिशय श्रीमंत आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या तीनही मुलांकडे प्रचंड संपत्ती आहे. जाणून घेऊया त्यांच्या तीन मुलांपैकी कोण अधिक श्रीमंत आहे ते.

आकाश अंबानीचे शिक्षण

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी ३२ वर्षांचा आहे. आकाशने आपले शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूल आणि मुंबईच्या कँपियन स्कूलमधून केले आहे.तर आकाशने अमेरिका स्थित ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून बिझनेस कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

नेटवर्थ

आकाश २०२२ पासून रिलायन्स जिओचे चेअरमन आहेत. याशिवाय ते जिओ प्लॅटफॉर्म आणि रिटेलमध्येही महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. त्यांचा वार्षिक पगार ५.४ कोटी रूपये आहे. तर आकाशची नेटवर्थ ४१ बिलियन डॉलर आहे.

इशा अंबानीचे शिक्षण

इशा आणि आकाश हे जुळे आहेत. इशाचा जन्म २३ ऑक्टोबर १९९१मध्ये झाला होता. २०१८मध्ये तिने बिझनेसमन आकाश पिरामलशी लग्न केले. तिचे शिक्षण धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूलमधून झाले आहे. याशिवाय तिने स्टँनफोर्ड युनिर्व्हसिटीमधून एमबीएचे शिक्षण घेतले होते.

नेटवर्थ

इशा अंबानी आपल्या वडिलांना बिझनेसमध्ये मदत करते. इशा रिलायन्स ग्रुप्सच्या रिटेल बिझनेसला हँडल करते. याशिवाय ती रिलायन्स बोर्डमध्ये नॉन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टरही आहे. तिच्याकडे रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ, रिलायन्स फाऊंडेशनच्या महत्त्वाच्या जबाबदारीही आहेत.रिपोर्ट्सनुसार तिचा वार्षिक पगार ४.२ कोटी रूपये आहे.

अनंत अंबानीचे शिक्षण

अनंत अंबानी हा नीता आणि मुकेश अंबानीचा छोटा मुलगा आहे. २९ वर्षीय अनंतचा जन्म १० एप्रिल १९९५ला झाला होता. धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमधीन बॅचलर डिग्री मिळवली.

नेटवर्थ

अनंत अंबानीही रिलायन्स आणि जिओमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहे. अनंतला २०२२मध्ये रिलायन्स रिटेलमध्ये डायरेक्टर्स ऑफ बोर्ड्समध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याचा वार्षिक पगार ४.२ कोटी रूपये असावा. तर नेटवर्थ ३,४४,००० कोटी रूपये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -