मुंबई: भारतीय क्रिकेट संघ यावेळेस झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. येथे ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. येथे ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप खिताब जिंकला आहे. या स्पर्धेच्या नंतर प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी सलामीवीर गौतम गंभीरला नवा प्रशिक्षकपद म्हणून नेमले आहे.
श्रीलंका मालिकेने करणार गंभीर सुरूवात
आता गंभीर या श्रीलंका दौऱ्यापासून आपल्या प्रशिक्षकपदाला सुरूवात करणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४नंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. येथे दोन संघादरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. या आठवड्याच्या शेवटची संघाची घोषणा केली जाईल. या दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले जाऊ शकते. तर वनडेचे नेतृत्व केएल राहुलला दिले जाऊ शकते.
याचे कारण रोहित शर्माला आराम असेल. रिपोर्ट्सनुसार रोहित या दौऱ्यातही आराम करू शकतो. वर्ल्डकपनंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीयमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. अशातच टी-२०मध्ये हार्दिक आणि वनडेमध्ये राहुल कर्णधार असू शकतो.
भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
२६ जुलै पहिला टी-२० सामना – पल्लेकल
२७ जुलै दुसरा टी-२० सामना – पल्लेकल
२९ जुलै तिसरा टी-२० सामना – पल्लेकल
१ ऑगस्ट पहिला वनडे सामना – कोलंबो
४ ऑगस्ट दुसरा वनडे सामना – कोलंबो
७ ऑगस्ट तिसरा वनडे सामना – कोलंबो
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सर्व टी-२० सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवले जातील. तर सर्व वनडे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवले जातील.