Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीWorld Population Day: वर्ष २०५० पर्यंत किती होणार भारताची लोकसंख्या?

World Population Day: वर्ष २०५० पर्यंत किती होणार भारताची लोकसंख्या?

मुंबई: जगभरात दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन(World Population Day) साजरा केला जातो. हा दिवस इतर दिवसांपेक्षा खास असतो कारण हा दिवस वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्याच्याशी संबंधित आव्हानांबाबत जागरूक केले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की २०५० पर्यंत जगातील लोकसंख्या किती वाढणार आहे तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताची लोकसंख्या किती असणार आहे?

जागतिक लोकसंख्या दिवस

जगातील सर्व देशांमध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. खरंतर हा दिवस आपल्या सगळ्यांना हे सांगतो की लोकसंख्या नियंत्रण किती महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच सर्व देशांनी किती गंभीरपणे या मुद्द्यावर काम केले पाहिजे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनलेला आहे. देशाची लोकसंख्या १४२. ८६ कोटीहून अधिक आहे. तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे.

जगातील वाढती लोकसंख्या

वाढती लोकसंख्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे. २०५० पर्यंत जगासोबत भारत आणि चीनची लोकसंख्याही वेगाने वाढेल. नोव्हेंबर २०२२मध्ये जागतिक लोकसंख्या अधिकृतपणे आठ अब्ज लोकांपर्यंत पोहोचली आहे. १९५५मध्ये पृथ्वीवर २.८ बिलियन लोक होते. मात्र आज एकटा भारत आणि चीनची लोकसंख्या इतकी आहे.

२०५० पर्यंत लोकसंख्या

रिपोर्ट्सनुसार २०५० पर्यंत भारत आणि चीननंतर नायजेरिया जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. यानंतर अनुक्रमे संयुक्त राज्य अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझील, कांगो, इथिओपिया आणि बांगलादेशचे स्थान असेल. रिपोर्ट्सनुसार २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ बिलियनपर्यंत पोहोचेल. यात एकट्या भारताची लोकसंख्या १.६७ बिलियनपर्यंत पोहोचेल. यानंतर चीनची लोकसंख्या १.३१ बिलियन आणि नायजेरियाची लोकसंख्या ३७७ मिलियनपर्यंत पोहोचेल.

दर दिवशी किती मुलांचा जन्म?

२०२२मध्ये जगभरात १३४ मिलियन मुले जन्माला आली. म्हणजेच दर दिवशी साधारणपणे ३६७००० नवजात बाळांचा जन्म झाला आहे. दरम्यान, ही संख्या खूप अधिक वाटू शकते. मात्र खरंतर २००१ नंतर नवजात बाळांची ही संख्या सर्वात कमी आहे.

मृत्यूचा आकडा वाढला

जगभरातील मृतांची संख्याही वाढत आहे. १९९०च्या दशकाआधी ही संख्या ५० मिलियनपेक्षा कमी होती आणि २०१९मध्ये ही ५८ मिलियन झाली. दरम्यान कोरोनाच्या काळात मृतांचा आकडा खूप वाढला होता. २०२०मध्ये ६३ मिलियन मृत्यूंची नोंद झाली होती आणि त्यानंतर २०२१मध्ये रेकॉर्ड ६९मिलियन मृत्यूंची नोंद झाली. २०२२मध्ये साधारण ६७ मिलियन मृत्यूंची नोंद झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -