Monday, May 12, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Urvashi Rautela : चित्रीकरण करताना उर्वशी रौतेला गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल!

Urvashi Rautela : चित्रीकरण करताना उर्वशी रौतेला गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल!

मुंबई : बॉलीवूडसह (Bollywood) दाक्षिणात्य (Tollywood) सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत असते. आगामी काळात उर्वशीचे अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे शूटिंगच्या (Shooting) कामांमध्ये व्यस्त असलेल्या या अभिनेत्रीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. उर्वशीचा येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली असून उपचाराकरिता तिला रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेलाचा येत्या काही महिन्यांत एनबीके १०९ (NBK 109) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नंदमुरी बाळकृष्ण आणि बॉबी देओल हे दिग्गज कलाकारही प्रमुख भुमिका साकारत आहेत. मागील वर्षापासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. मात्र या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान तिला अपघात झाला. चित्रपटात दाखवला जाणारा अॅक्शन स्टंट करताना तिच्या हाताला जबर मार बसला असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, उर्वशीला हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केले असून तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. उर्वशीला असह्य वेदना होत असल्यामुळे 'दुखापतीतून उर्वशी लवकरात लवकर बरी व्हावी', अशी तिच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.

Comments
Add Comment