Beryl Cyclone : बेरील वादळामुळे अमेरिकेत विध्वंस, चार जणांचा मृत्यू; लाखो घरे अंधारात!

सुरक्षेच्या कारणास्तव शाळा, व्यावसायिक आस्थापने, वित्तीय संस्था बंद


ह्यूस्टन : अमेरिकेतील (America) टेक्सास राज्यात 'बेरील' चक्रीवादळाने (Beryl Cyclone) प्रचंड हाहाकार माजवला आहे. 'बेरील' या शक्तिशाली वादळामुळे पूरस्थिती (flood) निर्माण झाली आहे. वादळामुळे किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ३० लाख घरे आणि व्यावसायिक आस्थापनांची वीज गेली आहे. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यावरून वादळ किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो.


राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सोमवारी संध्याकाळी सांगितले की, बेरील श्रेणी एक प्रकारातील वादळाने माटागोर्डाजवळ उग्र स्वरूप धारण केले. सध्या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. स्थानिक लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. “फक्त स्वच्छ आकाशामुळे धोका टळला आहे, असे समजू नका.” असे महापौर जॉन व्हिटमायर यांनी सांगितले आहे.



राष्ट्रीय चक्रीवादळाचा हाहाकार


राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सांगितले की, पूर्व टेक्सास, पश्चिम लुइसियाना आणि अरकांससच्या काही भागात पूर आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान घरांवर झाडे पडल्याने, २ लोकांचा मृत्यू झाला. तसेच पुराच्या पाण्यात अडकून ह्यूस्टन पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर आग लागण्याच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळाली आहे.



धोका संपलेला नाही


सध्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे मूल्यांकन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. महापौर जॉन व्हिटमायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "फक्त स्वच्छ आकाशामुळे धोका टळला आहे असे समजू नका." अजुनही परिस्थिती बिकट आहे. किती नुकसान झाले आहे याबाबत सध्या काही सांगता येणार नाही.

Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'ने अझर मसूदच्या कुटुंबालाच संपवले; तुकडे तुकडे केले!

नवी दिल्ली: भारताच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या