मुंबई : मराठा आरक्षणाबाबतची विरोधकांची भूमिका काय , त्यांना स्वतंत्र आरक्षण हवे आहे की, ओबीसी मधून हवे यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली . मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने बैठक बोलवली होती. मात्र त्यावर विरोधकांनी पाठ फिरवली होती. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असेल तर सभागृहात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली. त्याचा खरपूस समाचार नितेश राणे यांनी विधानसभेत घेतला
ते पुढे म्हणाले की, विरोधक हे दोन समाजाची धूळफेक करत असून ओबीसी तरुणांचे भविष्य अंधारात टाकत आहेत. काल बैठकीला न जाऊन विरोधकांचे खरे चेहरे समोर आले असून , विरोधकांचे लोकप्रतिनिधी स्वत्रंत्र आरक्षणाची मागणी करतात व सभागृहातील नेते ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत हे नकली चेहरे महाराष्ट्रासमोर येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. विरोधकांमुळे मराठा व ओबीसी समाजाचे भविष्य अंधारात टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली .
दरम्यान मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. या बैठकीला अनुपस्थित राहून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा, सामाजिक तेढ निर्माण करायचा आहे, आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद चिघळत ठेवून महाराष्ट्रातील शांतता भंग करायची असल्याचा आरोप करत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत घोषणाबाजी केली आणि सभागृहात गदारोळ गोंधळ झाला. अखेर अखेर विधानसभा अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले.