Tuesday, July 1, 2025

Laxmi Mata: या अंकावर असते नेहमी लक्ष्मी मातेची कृपा, तुमची जन्मतारीख ही आहे का?

Laxmi Mata: या अंकावर असते नेहमी लक्ष्मी मातेची कृपा, तुमची जन्मतारीख ही आहे का?
मुंबई: शास्त्रात लक्ष्मी मातेला धन-वैभवाची देवी मानली गेली आहे. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद ज्या लोकांवर राहतो त्यांच्याकडे धन-धान्याची कमतरता राहत नाही. यासाठी प्रत्येक व्यक्तीला तिला प्रसन्न करून तिचा आशीर्वाद मिळवायचा असतो.

अंकशास्त्रात अंकावरून एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच त्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल माहिती दिलीजाते. मूलांकावरून त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलची माहिती मिळवली जाते. मूलांकचा अर्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतिथी.

कोणत्या अंकाचा आहे लक्ष्मी मातेशी संबंध


अंकज्योतिषानुसार प्रत्येक अंकाचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी तसेच देव-देवतांशी संबंध जोडलेला असते. याच पद्धतीने लक्ष्मी मातेच्या प्रिय अंकाबाबत बोलायचे झाल्यास ६ अंकांशी लक्ष्मी मातेचा खास संबंध असतो.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६,१५ अथवा २४ तारखेला होतो त्यांचा मूलांक ६ असतो. अशा लोकांवर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते. या व्यक्तींना जीवनात कधीही पैशांची तंगी येत नाही.

सोबतच ६ मूलांकांचे लोक धन, ऐश्वर्याचे धनी असतात तसेच भौतिक सुख-सुविधांचा आनंद घेतात. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे या लोकांना कधीही आर्थिक समस्या जाणवत नाहीत.

सोबतच या व्यक्तींचा स्वभाव चांगला असतो. दुसरे लोक यांच्यामुळे लगेचच प्रभावित होतात आणि आकर्षित होतात. यांचा सरळ स्वभाव आणि विशेष गुणांमुळे यांच्या यादीत मित्रांची संख्या कमी नसते.
Comments
Add Comment