Sunday, March 16, 2025
Homeक्रीडाIND vs ZIM : भारताचा झिम्बाब्वेवर दमदार विजय, मालिकेत २-१ने आघाडीवर

IND vs ZIM : भारताचा झिम्बाब्वेवर दमदार विजय, मालिकेत २-१ने आघाडीवर

हरारे: भारत(india) आणि झिम्बाब्वे(zimbawbe) यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी हरवत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तसेच ऋतुराज गायकवाडच्या जबरदस्त ४९ खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवण्यात यश मिळवले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या होत्या.

भारताची सुरूवात दमदार झाली होती. यशस्वी जायसवाल आणि गिल यांनी जबरदस्त सलामी करताना ६७ धावा ठोकल्या. त्यानंतर यशस्वी ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलसोबत अभिषेक शर्मा खेळत होता. दुसऱ्या सामन्यात तडाखेबंद खेळी करणाऱ्या अभिषेकला या सामन्यात मात्र १० धावाच करता आल्या.

त्यानंतर ऋतुराज आणि गिलने एकत्र खेळण्यास सुरूवात केली आणि भारताचा डाव १८२ धावांवर नेऊन पोहोचवण्यास मदत केली.ind

झिम्बाब्वे विजयासाठी १८३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली. मात्र सुरूवातीपासून भारताच्या गोलंदाजांनी दबाव टाकण्यास सुरूवात केली होती. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त कामगिरी करताना ३ विकेट घेतल्या. तर आवेश खानने दोन बळी घेतले. यामुळे झिम्बाब्वेला २० षटकांत केवळ १५९ धावाच करता आल्या.यासोबतच भारताने या सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला.

या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त कमबॅक करताना सामना जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त विजय मिळवत ही आघाडी वाढवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -