मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा(malaika arora) आपल्या सुंदरतेसोबत परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. ५० वर्षीय मलायकाला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.
मलायकाने ५०व्या वयातही आपली फिगर मेंटेन ठेवली आहे. यासाठी ती खास डाएट घेते आणि वर्कआऊट रूटीनही फॉलो करते.सोबतच मलायका एक खास ड्रिंकही घेते ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
काही दिवसांआधी मलायकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना सांगितले होते की सकाळी उठून ती मेथी, जिरे आणि ओव्याचे पाणी पिते. हे सर्व ती रात्रभर भिजत ठेवते.
हे ड्रिंक शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कारण मेथीचे दाणे इन्सुलिन उत्पादनासाठी मदत करतात. याशिवाय ओवा आणि मेथी पोटाशी संबंधित त्रास जसे अॅसिडिटी आणि इतर गॅसच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
जिरे, मेथी आणि ओवा तीनही पाचन आणि मेटाबॉलिज्मचा वेग वाढवण्यास मदत करतात. यामुळे वजन घटवण्यास मदत मिळते. या तिघांच्या सेवनाने बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
इतकंच नव्हे तर या तीन गोष्टींचे सेवन तुमचे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे ड्रिंक फ्री रॅडिकल्सपासून लढतात आणि अँटी एजिंग म्हणून काम करतात.