नवी दिल्ली: देशभरात ७ राज्यांतील रिकाम्या असलेल्या १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मतदान सुरू होत आहे. याचे निकाल १३ जुलैला येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया गठबंधनाच्या चांगल्या कामगिरीनंतर सत्ताधारी एनडीए पक्षाला चांगली टक्कर मिळू शकते.
कोणत्या राज्यांत किती जागांवर पोटनिवडणूक?
बिहारच्या रूपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, रानाघाट दक्षिण, बगदा, मणिकताला, तामिळनाडूच्या विक्रावंदी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पंजाबमधील जालंध वेस्ट, हिमाचलमधील देहरा, हमीरपूर, नालागढ येथील जागांवर १० जुलैला मतदान होत आहे. हा जागा लोकसभा निवडणूक अथवा तेथील आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत.
तर यूपीमधील करहल, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूक, मझवा आणि सीसामऊ येथील जागांवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशात ९ आमदार खासदार बनले आहेत आणि तर समाजवादी पक्षाचे एक आमदार इरफान सोलंकी यांचे सदस्यत्व गेले यामुळे कानपूरच्या सीसामऊ विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.