Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीVegetable Price Hike : मुसळधार पावसाचा भाजीपाल्यावर फटका!

Vegetable Price Hike : मुसळधार पावसाचा भाजीपाल्यावर फटका!

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरही झाला आहे. सर्वसामान्यांना एकीकडे वाढत्या महागाईचा फटका बसत असताना आता त्यात मुसळधार पावसाचीही भर पडत आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्यांची (Vegetable Price Hike) आवक कमी मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा फटका बसलेला शेतमाल बाजारात येत आहे. तसेच आवक कमी झाल्याने काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. टोमॅटो, मिरची, भेंडी, आणि फुलकोबी याचे दर हे १०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर कांदे आणि बटाटे ६० ते ७० रुपये पर्यंत आहे. भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट (Kitchen Budget) कोलमडले आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -