Wednesday, April 30, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Skincare: पावसाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याची घ्या अशी काळजी, ग्लो करेल स्किन

Skincare: पावसाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याची घ्या अशी काळजी, ग्लो करेल स्किन

मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे चेहऱ्यावर ब्रेकआऊट्स, चिपचिपणे आणि खाज यासारख्या समस्या येऊ शकतात. या मोसमात ज्यांची स्किन सेन्सेटिव्ह असते त्यांना खूप प्रॉब्लेम होतो.

पावसाळ्याच्या दिवसांत स्किन अतिशय तेलकट होते. कधी ऊन, तर कधी पावसामुळे हवामान दमट होते. याच परिणाम स्किनवर होतो. यामुळे या मोसमात पिंपल्स आणि पुरळाची समस्या अधिक वाढते. चेहऱ्याची चमक कमी होते. अशातच त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अशी घ्या काळजी

चेहरा स्वच्छ करा

पावसाळ्याच्या दिवसांत चेहरा साफ करणे गरजेचे असते. दिवसांतून कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ करा. चेहरा धुण्यासाठी नीम फेस वॉश, ग्रीन टी फेस वॉश आणि टी ट्री फेस वॉशचा वापर करा.

गुलाबपाणी लावा

गुलाबपाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक राहण्यास मदत होते. गुलाबपाण्याचा तुम्ही टोनर म्हणून वापर करू शकता. या मोसमात फेस क्रीमरऐवजी गुलाबजल लावण्याचा सल्ला दिला जातो.

अधिक तेलकट होऊ देऊ नका

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर डस्टिंग पावडरचा वापर केला पाहिजे. असे न केल्यास चेहऱ्यावर येणारे अतिरिक्त तेल समस्या आणखी वाढवू शकतात.

लाईटफेस ऑईल लावा

पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेचे मॉश्चरायजर मेंटेन ठेवण्यासाठी लाईफ फेस ऑईलची निवड करा. यामुळे पिंपल्स आणि पुरळाचा त्रास दूर होऊ शकतो.

Comments
Add Comment