मुंबई: शाओमी रेडमीचा नवा फोन रेडमी १३ ५जी भारतात लाँच केला आहे. या फोनची सुरूवातीची किंमत १३,९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा पहिला असा फोन आहे जो स्नॅपड्रॅगन ४ जेन २ AE चिपसेटसोबत येतो.
सोबतच या फोनची खास बाब म्हणजे १०८ मेगापिक्सेल कॅमेरा, ५०३० mAh बॅटरी आहे. रेडमीच्या या फोनमध्ये १२० Hzरिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसोबत ६.७९ इंचाचा फुल -HD+ IPS LCD डिस्प्ले आहे आणि यात 1,080×2,400 पिक्सेल रेझोल्यूशन येते.
या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या 4nm ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 AE SoC आहे. यात ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. ड्युअल सिमचा हा Redmi 13 5G टॉपवर Xiaomi च्या हायपरओएस स्किनसोबत अँड्रॉईड १४वर काम करतो.
१०८ मेगापिक्सेल कॅमेरा
कॅमेरा म्हणून श्योमी Redmi 13 5G मध्ये सॅमसमग ISOCELL HM6 सेन्सर आणि f/1.75 अपर्चरसह १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की याचा प्रायमरी कॅमेरा 3x इन सेन्सॉर झूम ऑफर करतो. फोनमध्ये २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेराही मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.