नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपोस्टलने सन्मानित केले आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानले आहे.
ते म्हणाले हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हे भारत आणि रशिया यांच्यातील अनेक वर्षे जुन्या मैत्रीचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान म्हणाले की भारत आणि रशिया यांच्यात विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त भागीदारीच सन्मान आहे. पंतप्रधान म्हणाले, पुतिन यांच्या नेतृत्वात गेल्या २५ वर्षांपासून भारत आणि रशिया यांच्यातील संबंध मजबूत झाले आहेत आणि प्रत्येकवेळेस नव्या उंची गाठत आहेत.
भारताचे पंतप्रधान मोदींनी भारत आणि रशियाच्या लोकांच्या चांगल्या भविष्याबाबत बातचीत केली. तसेच ते म्हणाले की सर्व क्षेत्रातीतल संबंध मजबूत करावे लागतील. आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे केवळ दोन देशांना नव्हे तर संपूर्ण जगाला फायदा होईल.
पंतप्रधान पुढे म्हणाले, भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी महत्त्वाची आहे. आमच्या मत शांती आणि स्थिरतेचे प्रयत्न सुरू राहिले पाहिजेत. आम्ही या दिशेने सातत्याने काम करत आहोत.
ते पुढे म्हणाले, आजच्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी आणखी गरजेची आहे. येणाऱ्या काळात आम्ही एकत्र मिळून या दिशेने काम करत राहू.