Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीNashik news : ऑनलाईन बुक केलेल्या गाडीत लाखोंचा गांजा! नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik news : ऑनलाईन बुक केलेल्या गाडीत लाखोंचा गांजा! नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नाशिक : ऑनलाईन (Online) बुक केलेल्या गाडीत लाखोंचा गांजा सापडल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) गांजाने (Ganja) भरलेली गाडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीत असलेल्या भारतनगर (Bharatnagar) येथून ताब्यात घेतली आहे. या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना एक चार चाकी वाहन संशयास्पद आढळून आले. त्यानंतर या वाहनाची झाडाझडती घेतली असता १९.६५ किलो गांजा आढळून आला आहे.

ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट गाडीत गांजा सापडल्याने खळबळ

पोलिसांनी कारचा चालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले असून कारचालकाने गाडीत एक महिला अनेक पुरुष पुण्याहून नाशिककडे गाडी ऑनलाईन बुकिंग करून आले होते आणि हे सर्व पार्सल त्यांचे असून ते दोघे भारत नगर चौफुलीवर मला थांबवून पार्सल घेण्यासाठी येईल त्याला देण्याचे सांगून निघून गेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

गांजा, कुत्ता गोळी विकणाऱ्यांना बेड्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहरातील कल्लू स्टेडिअम भाग व दगडी शाळेजवळ पोलिसांनी कारवाई करत कुत्ता गोळी व गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. कल्लू स्टेडियम जवळ जलील अहमद मोहम्मद शरीफ हा कुत्ता गोळी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत संशयित जलीलकडून 39 हजार रुपये किमतीच्या 2 हजार 925 कुत्ता गोळ्या जप्त केल्या. दुसरी कारवाई येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडी शाळेच्या पाठीमागे जिशान अहमद नफीस अहमद (28 रा. सलीम नगर) हा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या ठिकाणी छापा टाकत जिशानकडून 19 हजार रुपये किमतीचा एक हजार नऊशे ग्रॅम गांजा जप्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -