Monday, March 24, 2025
Homeक्रीडाGautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाह...

Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीर इतिहासात टीम इंडियाचे २५वे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. आता जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मालिकेत गंभीर भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून जॉईन करतील. दरम्यान, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण अंतरिम प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्सच्या माध्यमातून गंभीरला हेड कोच बनवण्याबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले, मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील.

 

गंभीरच्या मेंटॉरशिपमध्ये केकेआर बनली आयपीएल चॅम्पियन

द्रविडचा कार्यकाळ संपण्याच्या बातम्या येण्यासोबतच गौतम गंभीर पुढील प्रमुख प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. आता जय शाह यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. येथे गंभीर प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -