Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : मुंबईतील 'या' पब, बारवर कठोर कारवाई करा!

Eknath Shinde : मुंबईतील ‘या’ पब, बारवर कठोर कारवाई करा!

मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वरळीतील हिट अँड रन (Worli Accident) प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यानंतर (Pune) मुंबईतील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणावरुन राज्यातील जनतेचा दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांनी पुणे शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व पब व बारवर कठोर कारवाई केली होती. त्यानंतर आता मुंबईतील अपघाताचे वाढते सत्र रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला नियमभंग करणाऱ्या पबवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर मद्यधुंद असताना वाहने चालविणाऱ्याचा परवाना रद्द करण्यात यावा. तसेच रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यांसह नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

  • रात्रीच्या वेळेस गाड्या तपासण्यांचे प्रमाण वाढवावे.
  • मद्यसेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी.
  • नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यात यावा.
  • मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी.
  • पब, बार, उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ, ध्वनिप्रदुषणाचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या कराव्या.
  • रात्री उशिरा सुरू राहणारे बार, पब, उपाहारगृहांवर कारवाई करावी. पालिका व पोलिसांनी त्यांचे परवाने रद्द करावे.
  • मद्यासेवन करून वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -