Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीPolice recruitment : पावसामुळे महिला पोलीस भरतीत मोठी अडचण!

Police recruitment : पावसामुळे महिला पोलीस भरतीत मोठी अडचण!

भरती पुढे ढकलण्याची अमरावतीतून मागणी

अमरावती : मुंबईसह राज्याच्या विविध भागांना सध्या पावसाने झोडपून (Heavy rainfall) काढले आहे. अमरावतीत (Amravati) देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र याचा फटका अमरावतीतील पोलीस भरती परिक्षेला (Police recruitment) बसला आहे. पोलीस भरतीची प्रात्यक्षिक परीक्षा ज्या मैदानावर होणार आहे, त्या ठिकाणी सर्वत्र पाणी साचलं आहे. त्यामुळे परीक्षा देताना परीक्षार्थींना अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमरावतीमधून करण्यात येत आहे.

सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांत महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले आहे. ग्राऊंडवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना धावणे व इतर शारीरिक चाचणी करणे अशक्य आहे. त्यामुळे भरती पुढे ढकलण्याची मागणी भरतीसाठी आलेल्या मुलींनी केली आहे.

सकाळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने मुली या मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम बाहेर जमल्या असून आजची पोलीस पोलीस भरती पुढे ढकलण्याची आक्रमक मागणी मुलींनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -