Friday, July 19, 2024
Homeक्रीडाVirat Kohli : जगज्जेत्यांनाही कायदा समान; कोहलीच्या पबवर पोलिसांची मोठी कारवाई!

Virat Kohli : जगज्जेत्यांनाही कायदा समान; कोहलीच्या पबवर पोलिसांची मोठी कारवाई!

नेमकं प्रकरण काय?

बंगळुरु : राज्यात अनधिकृत पब्सचा मुद्दा गाजत असतानाच देशभरातही उशिरापर्यंत चालू असलेल्या बार, पब्सवर कारवाई केली जात आहे. कर्नाटकच्या (Karnataka)बंगळुरू पोलिसांनीही (Bengluru Police) रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई केली. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat Kohli) मालकीचे एक पबही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील एमजी रोडवर ‘वन 8 कम्युन पब’ (One 8 commune pub) आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दिलेली वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरु असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, रात्री मोठ्या आवाजात गाणी वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या आहेत.

पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल

पब फक्त मध्यारात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, असेही पोलिसांनी सांगितले. यापेक्षा जास्त वेळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित ‘वन 8 कम्युन पब’ चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. ६ जुलै रोजी, वन 8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाजाच्या वेळेपलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -