Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीBank Job : 'या' बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी!

Bank Job : ‘या’ बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी!

मिळणार भरघोस पगार; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : सरकारी बँकेत (Government Job) नोकरी करण्याची अनेकांची इच्छा (Bank Job)असते. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) काही रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. एसबीआयने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज प्रकिया देखील सुरु करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईनरित्या अर्ज भरावा लागणार आहे. जाणून घ्या अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, अर्ज फी, वेतन, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी चार रिक्त जागांसाठी भरती जारी केली आहे. २४ ते ४० वर्ष वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करु शकणार आहेत. ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता

डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवाराने एमबीए, पीजीडीएम पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे आणि गुणवत्ता यादीवर केली जाणार आहे.

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क

या नोकरीसाठी सामान्य, ओबीसी/EWS उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWBD प्रवर्गातील लोकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. तर या नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२४ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -