मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल असे महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.
– वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)
– एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)
– मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)
– चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)
– आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)
– नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)
– जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)
– प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)
– नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)
– लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)
– शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)
– रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)
– धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)
– बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)
- मध्य रेल्वेवरील कर्जत-खोपोली, कसारा येथून सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंतच धावत असून ती पुढे रद्द करण्यात आली आहे.
- भांडुप स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावर झाला आहे.
- कुर्ला-मानखुर्द स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- वडाळ्यात पाणी साचल्यानं गोरेगाव-सीएसएमटी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
- पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ३ तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
- येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ८ जुलै ते १० जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- रात्री १ ते सकाळी सातपर्यंत अनेक ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.