Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई महानगरपालिकेचा आदेश


मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे. काही ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य व हार्बर रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. यामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.


याआधी केवळ पहिल्या सत्रातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता दुसऱ्या सत्रालाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment